महाराष्ट्र मंडळाचे वार्षिक सभासदत्व हे १ ऑगस्ट ते ३१ जुलै असते. सभासत्वाची वर्गणी आगामी वर्षातील कार्यक्रम व इतर खर्च विचारात घेऊन  दरवर्षी  कार्यकारिणी समिती ठरविते.  सभासदत्व ऐच्छिक असले तरी सभासदांना अनेक कार्यक्रमात सवलत दिली जाते. काही कार्यक्रम (उदाहरणार्थ, गणेशोत्सव) मोफत ठेवले जातात. 


२०१८-२०१९ वर्षासाठी खालील दर निश्चित केले आहेत.


* प्रौढ ५० डॉलर

* मुले (५ ते १८ वर्षे) २५ डॉलर

* विद्यार्थी ४० डॉलर


वार्षिक वर्गणी परत करण्यात येत नाही आणि अहस्तांतरणीय आहे.


सभासदत्वाचा फायदा काय?

मंडळाचे सभासद व्हायचे का नाही हा खरे तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.  सभासद होऊन व कार्यक्रमाला उपस्थित राहून मंडळाप्रती असलेली आपुलकी/स्नेह तुम्ही दाखवता.  लॉस एंजेलिस परिसराचा परीघ मोठा असल्याने सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे सर्वाना शक्य होत नाही याची आम्हाला जाणीव आहे.  शेवटी काय भारताच्या एका प्रांतातून आलेली फक्त भाषेमुळे जोडली गेलेली आपण मंडळी! आपण मंडळ चालवतो, एकत्र येतो, सण साजरे करतो ते कशासाठी?  तर आपली संस्कृतीशी नाळ पूर्णपणे तुटू नये, आपल्या पुढच्या पिढीला ती समजावी, भाषा जमेल तितकी अवगत व्हावी किंबहुना आपलीशी वाटावी म्हणून.  त्यामुळे सभासदत्वाचे पैसे देऊन मला काय मिळेल किंवा त्याचे मूल्य ("value for money") काय असे प्रश्न काहीप्रमाणात गौण ठरतात. आपले आर्थिक गणित आणि सभासदत्वाने मला काय मिळेल हे ज्याचे त्याने ठरवावे.


मंडळातर्फे वर्षभरात साधारणपणे खालील कार्यक्रम आखले जातात. यातील ठळक अक्षरातील कार्यक्रम नक्की केले जातात व उर्वरित हे समितीवर अवलंबून असतात.


* गणेशोत्सव 

* कोजागिरी पौर्णिमा

* दिवाळी

* संक्रांत

* गुढीपाडवा

* सहल

* मराठी नाटक / चित्रपट

* मराठी सांगितीक कार्यक्रम

* आनंद मेळा

* कॅम्पिंग


As mentioned above, membership is just a token and it provides connection to the organization and community.  You can use Membership Benefit Table to see difference in prices for various MMLA events for members and non-members.


MMLA Membership can be paid in two ways:
  • By Credit Card
    • MMLA accepts payments through Paypal. You don't have to be paypal member to pay by credit card.
    • Click on Membership to proceed. 
  • By Check
    • Please write your check in favor of MMLA
    • Mail Checks to:
Jaya Kirtikar (Treasurer, MMLA 2018 - 19)

1184 West 30th St Apt 11

Los Angeles, CA 90007

Please send your address and phone number with your payment.  If you are adding family membership, please include family names as well for our record.


Web Feedback | 1122 Arcadia Ave #G, Arcadia, CA 91007

MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductibleOur federal tax id is:- 68-0538817


Powered by Wild Apricot Membership Software